अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत खांदला अंतर्गत रायगट्टा येथे जीर्ण झालेली वर्गखोली होती.यामुळे शाळकरी मुलांना पावसाळ्यात वर्गात बसून शिक्षण घेणे हे धोक्याचे झाले होते म्हणून तेथील गावकऱ्यांनी सन 2021-2022 मध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडे नवीन वर्ग खोली इमारत बांधकामाची मागणी केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन वर्ग खोली मंजूर केले होते.
आज त्या वर्गखोलीचे चे बांधकाम पूर्ण झाले असून माजी सरपंचा सौ शकुंतला माधव कुडमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोली उपलब्ध करून दिल्याने गावकरी व पालकवर्गानी समाधान व्यक्त करून आभार मानले या वर्गखोली च्या लोकार्पण च्या वेळी प्रामुख्याने गावाचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार,
माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी ग्राप सदस्य नारायणजी कंबगोनीवार,माजी ग्राप सदस्या वंदना अलोने,माजी ग्राप सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार,माजी ग्राप सदस्य सुधाकर आत्राम,आविस सल्लागार माधव कुडमेथे,व्यंकण्णा कडार्लावार,नागेश चिंतावार,
रामशंकर अंबलीपवार,नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले,रज्जू मोहूर्ले,रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला,दुर्गाजी आलाम,ग्रामसेविका संतोषी सडमेक,शिक्षक सोयाम सर,वाचामी सर सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.