नरखेड – अतुल दंढारे
शहीद रत्नाकर कळंबे स्मृती प्रित्यर्थ वास्का व सिको काई कराटे इंटरनॅशनल नागपूर द्वारा आयोजित केजाजी मंगल कार्यालय जलालखेडा येथे दि. 3 मार्च 2024 ला तालुका आंतर शालेय कराटे स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील जीवन विकास प्राथमिक शाळा देवग्राम, जीवन विकास विद्यालय देवग्राम,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेठ मुक्तापुर, ऑरेंज सिटी कॉन्व्हेन्ट नरखेड, श्री. वामनरावजी मानकर हायस्कूल खामली, श्री. आर. एम इंगोले हायस्कूल भारसिंगी, जनता हायस्कूल जलालखेडा, ऑर्किड पब्लिक स्कूल काटोल, माऊंट कार्मेल स्कूल काटोल, ट्रायसेन स्कूल सावरगाव या सहभाग नोंदवत जवळ पास 200 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलास चौधरी माजी (सी आर पी एफ अधिकारी), प्रमुख पाहुणे श्री. मनोज शेंडे (पोलीस उपनिरीक्षक) पोलीस स्टेशन जलालखेडा, विरपत्नी अर्चना ताई कळंबे,श्री.योगेश(गोलू)चौरे सामाजिक कार्यकर्ते, श्री. सतीश (गोलू) मेहतकर सामाजिक कार्यकर्ते ,कराटे असोसिएशन चे विदर्भ प्रमुख सेन्साई किरण यादव सर,
सेंसाई विनोद डाहरे सर , श्री. विरेन सर, सेन्साई घनश्याम कळंबे, सेन्साई नरेंद्र बिहार उपस्थित होते.सर्व प्रथम शहीद रत्नाकर कळंबे यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलास चौधरी यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खेळाचे महत्त्व पटवून सांगितले. व सर्व खेळाडू ना शुभेच्छा दिल्या.
विरपत्नी अर्चना ताई कळंबे यांनी खेळाच्या माध्यमातून समोर जाऊन आपणास कसे देशसेवा करता येईल हे पटवून दिले,प्रमुख पाहुणे श्री. मनोज शेंडे पोलीस उपनिरीक्षक यांनी कराटे प्रशिक्षण चे फायदे सांगत कसे आपण स्वतः चे रक्षण करू शकतो हे सांगितले. या प्रसंगी कराटे खेळाडूंनी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
या स्पर्धेत पंच म्हणून सेन्साई तुषार डोईफोडे, सेन्साई विकी कडू, सेन्साई वैभव ब्राह्मणकर, सेन्साई आचलं राऊत, मास्टर अनमोल भोयर , वृषभ मांडले, वृषभ नीलटकर यांनी पंचाचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या स्पर्धेच्या यशस्वी करिता नवीन उनरकर, रमेश राकेश , मनीष निमजे, उत्कर्ष उनरकर ,मंतशा शेख, यांनी अथक परिश्रम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका आंतर शालेय कराटे स्पर्धेचे आयोजक सेन्साई नरेंद्र बिहार यांनी केले तर आभार सेन्साई दुर्वास (विकी) कडू यांनी केले.