नरखेड – अतुल दंढारे
नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संत्रा बाजार यार्ड मध्ये आज मृग बहार संत्रा खरेदीचा शुभारंभ सभापती सुरेश आरघोडे यांच्या हस्ते संत्रा ढेरी पूजन करून करण्यात आला. तसेच प्रथम लिलाव होणाऱ्या संत्रा ढेरीचे शेतकरी धनराज काळबांडे यांचा सभापती सुरेश आरघोडे यांच्या हस्ते दुपट्टा, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . पहिल्याच दिवशी सुमारे ४५० संत्रा गाड्यांची आवक झाली. ३५ हजार ते ४२हजार प्रति टन असा विक्रमी भाव संत्र्याला मिळाला. त्याचा आनंद संत्रा उत्पादक शेतकर्यांमध्ये दिसत होता.
शुभारंभ प्रसंगी उपसभापती चंद्रशेखर मदनकर, संचालक दिनेश्वर राऊत , संजय दळवी, मनीष फुके, रुपेश मुंदाफळे, अशोक राऊत संचालक व व्यापारी मुशीर शेख उपस्थित होते. बाजार समितीचे प्रमुख अडते व व्यापारी लल्लन प्रसाद साह, विलायतीलाल सहगल , ओमप्रकाश मैनानी, बब्बूमिया पठाण बरेलीवाले, नाजीम पठाण, अशपाक पठाण, हादी काझी, शेख सादिक, मुश्ताक पठाण, अब्बू खान, सुधाकर ढोके, मुरतुजा गुलाम नबी शेख यांनी लिलावात भाग घेऊन संत्रा खरेदी केला.
यावेळी माजी संचालक संतोषराव महंत, प्रशांत भोसले, ओम खत्री, सुदर्शन नवघरे, जाकीर शेख, गुणवंत काळे, अशोक राऊत, राजू जाऊळकर, बाजार समितीचे सचिव सतीश येवले, कोषपाल राधेश्याम मोहरिया , कनिष्ठ लिपिक सुनील कडू, पुरोषत्तम दातीर, अमोल ठाकरे, रवींद्र बांदरे , विनोद रहाटे, धीरज डफरे, अशोक कुकडे, प्रकाश वासने, राहुल सोमकुवर व परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत्र्याला योग्य भाव मिळण्याकरिता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा व मोसंबी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या लिलावात विक्रीकरिता आणण्याचे आव्हान बाजार समितीचे सभापती सुरेश आरघोडे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना केले.
फोटो ओळ – प्रथम लिलाव शेतकरी धनराज काळबांडे यांचा सत्कार करताना सभापती सुरेश आरघोडे व इतर मान्यवर