Monday, December 23, 2024
Homeराजकीयप्रभाग १८ मधील शामराव नगर येथील अर्थसंकल्प बजेट २०२२ मधून १ कोटी...

प्रभाग १८ मधील शामराव नगर येथील अर्थसंकल्प बजेट २०२२ मधून १ कोटी ५० लाख रुपयेच्या मुख्य रस्त्याचे शुभारंभ – आमदार सुधीर गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली प्रभाग 18 मधील शामराव नगर येथील अर्थसंकल्प बजेट २०२२ मधून मंजूर करण्यात आलेले आकाशवाणी ते स्वराज्य चौक ते आण्णा सतगोंडा पाटील नगर ते इनामधामनी रोड हसरा चौक या 1 कोटी 50 लाखाच्या रस्ते विकास कामाचे शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर रस्ता हा हरिपूर कोथळी पूलाला समांतर रस्ता असून हा रस्ता हनुमाननगर येथील मंजूर करण्यात आलेले 25 कोटीचे नाट्यगृहा कडे जाणारा उपयुक्त रस्ता असून सांगलीच्या इतिहासात शामराव नगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सदर रस्ता मंजूर केला आहे असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले केले.

या प्रसंगी अमर पडळकर, रोहित जगदाळे, शहाजी भोसले, रोहित बाबर, गीताताई जगदाळे, वैशालीताई पडळकर, जयश्री मगदूम, नाना मगदूम, उमेश नरगुंदे, संपत माळी, विपुल कलादगे, मनोज यमगर, संतोष कदम, गणपती साळुंखे, गौस पठाण ठेकेदार रमेश मोह्नानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंदू गुरव आदि मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: