गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचा सदैव विचार करणारे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या प्रयत्नाने धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी खळबंदा जलाशयामध्ये सोडण्यात येत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस व सर्वसामान्यांच्या हिताचे व क्षेत्राच्या विकासाची भूमिका घेत पटेल यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांची माहिती माजी आमदार राजेंद्रजी जैन याप्रसंगी दिली.
आज ग्राम खातीटोला तालुका गोंदिया येथे नविन आंगणवाडी ईमारतीचा लोकार्पण सोहळा व महिला मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. मेळाव्याला मार्गदर्शन करतांना केंद्र व राज्य शासनाच्या महिलाकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी माजी आमदार राजेंद्रजी जैन, पंचायत समिति सभापति मुनेश रहांगडाले, निरज उपवंशी, अंजली अटरे, शंकरलाल टेम्भरे, गौरीशंकर बिसेन, प्रिती सेलोटे, पूजा उपवंशी, सरिताताई कटरे, अण्णा चौधरी, योगेश पतेह, ललिता ठाकरे, प्रितीचंद चौधरी, पुरुषोत्तम भोयर, जगदीश चौधरी, स्वाती टेम्भरे, विवेक चौधरी, के.वि. तावाडे, प्रवीण बोपचे, संजय चौरे, कविताताई वरठी, सुनिता बारेवार, उषा रामटेके, नरेंद्र ठाकरे, सुरेश चौरीवार, सहित मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.