Sunday, December 22, 2024
Homeराज्यदेवग्राम येथे अमोई क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन...

देवग्राम येथे अमोई क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन…

नरखेड – अतुल दंढारे

अंत्योदय मिशन ,देवग्राम या संस्थेच्या वतीने जीवन विकास विद्यालयात अमोई क्रीडा महोत्सवाचे उदघाटन देवग्राम येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. सुभाषबाबू दंढारे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोई क्रीडा महोत्सव तीन दिवस म्हणजे 13,14 आणि 16 जानेवारी 2023 पर्यंत आयोजित केलेला आहे .आयोजनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास व्हावा आणि त्यांचे आरोग्य निरोगी, सुदृढ, निकोप आणि निरामय रहावे आणि उत्तम खेळाडू तयार व्हावा तसेच चारित्र्यवान विधार्थी घडावा हा उद्देश समोर ठेऊन विध्यार्थ्यांना क्रीडांगण उपलब्ध करून दिल्या जाते.

या क्रीडा महोत्सवात मैदानी खेळ, सांघिक खेळ म्हणून कबड्डी, खो खो ,व्हॉलीबॉल, लंगडी ,बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाडू खेळतात. या क्रीडा महोत्सवात C.B .S.E. पासून ते Post Graduate पर्यंतच्या विधार्थांचा खेळामध्ये सहभाग होता. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुभाषबाबू दंढारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. देवेंद्र भोंगाडे होते. अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शरीर हीच खरी संपत्ती आहे ,म्हणून सर्वच विधार्थांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा ,प्राणायाम आणि क्रीडांगणावर जाऊन खेळ खेळले पाहिजे जेणेकरून आपले आयुष्य वाढेल, असे मोलाचे मार्गदर्शन आणि विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश सरोदे,

ITI चे प्राचार्य श्री ठाकरे सर, पूजा बोन्द्रे ,जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर, डॉ. राजू श्रीरामे, डॉ. मंगेश आचार्य,प्रा. नागेश ढोबळे, , श्री दिनेश पांगुळ, डॉ. कल्याणी ठाकरे, श्री बोबडे सर,, , अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रमुख श्री मंगेश निंबुरकर ,श्री नरेंद्र बिहार श्रीमती सुषमा बढिये,श्री योगेश दंढारे, श्री मदन ढोले, श्री मनोहर कामडे, श्री प्रमोद बैस, श्री संदीप फुके, श्री राहुल कोरडे, श्री चेतन पाल नरेंद्र बालपांडे ,सर्वच प्राध्यापक वृंद ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोलाचे योगदान आणि सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन विकास प्राथमिक शाळेचे कराटे शिक्षक आणि अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रमुख श्री नरेंद्र बिहार यांनी केले. आभारप्रदर्शन अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष श्री मंगेश निंबुरकर यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: