रामटेक – राजु कापसे
दि. 9/7/2023 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती द्वारा संचालित कर्मयोगी स्वर्गवासी श्री .सदाशिव गोविंद कात्रे फिजियोथेरेपी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री मा. डॉ.निनाद पाठक किमया हॉस्पिटल रामटेक तर प्रमुख वक्ते म्हणून श्री उमेश मेंढे विदर्भ प्रांत सह. सेवा प्रमुख तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मा. ॲड .किशोर नवरे रामटेक नगर संघचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय श्री राहुल गराडे यांनी केले.
प्रास्ताविकात सेवा विभागातर्फे चालणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती सांगितली त्यात सूर्यनारायण राव रुग्ण साहित्य सेवा केंद्र. हे प्रकल्प समाजातील गरजू लोकांना लागणारे रुग्ण साहित्य या प्रकल्पामार्फत समाजातील लोकांना नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. सूर्यनारायण राव संघाचे प्रचारक होते आणि 1946 मध्ये संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य केले विविध जबाबदाऱ्या पार पाडत ते अखिल भारतीय सेवा प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं.
सोबतच आज कर्मयोगी स्वर्गवासी श्री सदाशिव गोविंद कात्रे फिजिओथेरपी केंद्राचं उद्घाटन सोहळा पार पडला. 1943 ला ते संघाच्या संपर्कात आले आणि संघमय झाले.संघाचे द्वितीय सर संघ चालक परमपूजनीय श्री गुरुजी यांच्या प्रेरणेतून 1962 ला भारतीय कुष्ठरोग निवारक संघ याची स्थापना करण्यात आली चांप्याला जमीन उपलब्ध झाली.
तिथे आश्रम बांधण्यात आलं . आणि स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा त्यांनी सुरू केली. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सेवाभाव वृत्तीमुळे समाजामध्ये प्रकल्पाची ख्याती सर्वदूर पसरली. त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या नावाने फिजिओथेरपी केंद्र आज सुरू करीत आहोत.अशा या कर्मयोगी व्यक्तीचे नाव आपल्या केंद्राला देण्यात आले.
प्रमुख अतिथी श्री डॉ. निनाद पाठक सर यांनी प्रकल्प सुरळीत कसं चालेल या संदर्भात मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड .श्री किशोर नवरे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलं की रामटेक मध्ये अशा प्रकारचं पहिलाच प्रकल्प सेवा विभागातर्फे सुरू करीत आहोत आणि खूप चांगला प्रकल्प सेवा विभागाच्या माध्यमातून सुरू होत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री उमेश मेंढे यांनी संघाच्या माध्यमातून विविध सेवा कार्य विविध क्षेत्रात देशभर चालत असतात याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रमांमध्ये श्री उल्हास इटनकर विदर्भ प्रांत बुद्धी प्रमुख ,श्री राजेश बोंद्रे रामटेक विभाग कार्यवाह, वैष्णवजी राऊत रामटेक विभाग प्रचारक, श्री ऋषिकेश किंमतकर तसेच रामटेक नगरातील स्वयंसेवक आणि कार्यकर्ते व माता, बंधू, भगिनी उपस्थित होते.
फिजिओथेरपीस्ट डॉ.सायली साखरवाडे यांनी फिजिओथेरपी का व कशासाठी याविषयी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे संचालन श्री राहुल वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प समितीचे सचिव श्री लक्ष्मीकांत तिबुडे सर यांनी केले.