माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात केला प्रवेश.
गडचिरोली – अहेरी तालुक्यातील तथा सद्या ग्रामपंचायत निवडूक जाहीर झालेल्या राजाराम येथील माजी सरपंच नागेश कन्नाके यांचासह राष्ट्रवादी काँग्रेस तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत काल अहेरी येथील रुक्मिणी महालात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला,
ह्यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले, विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे, तुमचा विश्वासघात मी कदापी होऊ देणार नाही, तुमच्या क्षेत्रांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले, राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है” अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली..!!
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे, ह्यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!