• पशुसंवर्धन सभापती पती तथा माजी पं.स. सदस्य मोहन रोकडे व पं.स.सदस्य गोपाल घाटे यांनी दिली भेट..
• नंदगाव पिंजर तहसील महसूल मंडळ मध्ये धाकली या गावच्या शिवारामधील रामराव पाटील धाने यांच्या ६ एक्कर पपई चे लाखोचे नुकसान..
मूर्तिजापूर – ३१ ला सायंकाळी ५.३० च्या दरम्यान मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बर्शिटाकळी तालुक्यातील नंदगाव पिंजर तहसील महसूल मंडळ मध्ये धाकली या गावच्या शिवारामधील रामराव पाटील धाने यांच्या ६ एक्कर पपई लागवड असलेल्या शेतामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अतोनात पपई पिकाचे नुकसान झाले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्या त्या असणा-या उत्पादन खर्चाच्या आधारीत भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात खर्च करून पपई पिक उभे केले .आणि चांगल्या परिस्थितीमध्ये व उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पपई पिकाचा प्लॉट ऐन वेळेस तोंडात आलेला घास निसर्गाच्या नहरीपणामुळे हिसकावून घेतला.
त्यामुळे सदर शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या सर्व स्तरावरून योग्य ती कारवाई व पाहणी व पंचनामे करुन या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्यात यावी. अन्यथा या विरुद्ध शासन दरबारी आवाज उठवला जाईल आंदोलन करण्यात येईल. शासनान तत्काळ या शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी पशुसंवर्धन सभापती अकोला पती तथा माजी पं.स.सदस्य मोहन रोकडे , पं.स.सदस्य गोपाल घाटे यांनी केली आहे यावेळी राहुल इंगोले व शेतकरी उपस्थित होते .
ढाकली येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करून त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी. सदर शेतकऱ्याला मदत न मिळाल्यास शासन दरबारी आवाज उठवल्या जाईल व आदोलण करणूयात येईल. (मोहन रोकडे (माजी .पं.स. सदस्य मुर्तिजापूर )
पपई पिकाचे नुकसान होऊन लाखो रुपयाचे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे . सदर शेतकऱ्याचा अंत न पाहता शासनाने शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी – गोपाल घाटे (पं.स.सदस्य मुर्तिजापूर )