Thursday, January 9, 2025
Homeगुन्हेगारीशितलवाडीतील मंदीरात चोरी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या...रामटेक पोलिसांची कामगिरी

शितलवाडीतील मंदीरात चोरी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या…रामटेक पोलिसांची कामगिरी


रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी ) शहरालगत असलेल्या शितलवाडी येथील श्री सिद्धीविनायक गणेश मंदीर येथे विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या रामटेक पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्यांच्याकडुन विविध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शितलवाडी येथील श्री सिद्धीविनायक गणेश मंदीर येथे नुकत्याच दि. १६ जुलै चोरी झाल्याची घटना घडली. वार्ता वाऱ्यासारखी पसरली. घटनेची तक्रार रामटेक पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. चोरांचे फुटेज सी.सी.टी.व्ही. मध्ये आलेले होते मात्र ते चेहऱ्यावर दुपट्टा बांधुन होते. रामटेक पोलिसांचा तपास सुरु असतांनाच त्यांना गुप्त माहितीद्वारे चोर हे लगतच्या मानापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भोजापुर येथील असल्याचे समजले.

रामटेक पोलिसांनी लागलीच तेथे जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या व विचारपुस केली असता लोमेश प्रभाकर चांदेकर वय 28 याने सदर गुन्हा दिलीप चंद्रभान येवले वय 31 वर्ष दोन्ही रा भोजापूर ता. रामटेक याच्या सोबत केल्याची कबूली दिली व सदर गुन्हयातील मुद्देमाल हा आरोपीताचा ताब्यातून पंचासमक्ष जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये लाऊडस्पीकर मशीन किमत ७ हजार / रु. , नगदी ९०० /- रु. , हिरो होंडा कंपनीची सुपर स्पेलडर क्र. MH-40- H- 9085 किमती 30,000/- रु . असा एकूण 37,900/- रु चा माल जप्त करण्यात आला. पो.स्टे.रामटेक येथे अप. क्र. ४६६/२३ कलम ३७९ भा.द.वी. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: