Monday, December 23, 2024
Homeखेळपहिल्या नॅशनल इंडियाका कप स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील अंमलदार विनोद भंडारे यांनी...

पहिल्या नॅशनल इंडियाका कप स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील अंमलदार विनोद भंडारे यांनी पटकावले सुवर्ण पदक…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिली नॅशनल इंडियाका कप 2022 2023 स्पर्धेमध्ये नांदेड पोलीस दलातील पोलीस अंमलदार विनोद खंडुजी भंडारे यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. सदरची स्पर्धा ही दिनांक 06.01.2023 ते दि. 08.01.2023 दरम्यान गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम क्रीडा संकुल इंडोर हॉल येथे पार पडली.

या स्पर्धेत उत्तरप्रदेश, केरळ, छतीसगड, महाराष्ट्र, जम्मु काश्मीर इत्यादी राज्यातील एकुण 250 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या गेमचे इंटरनॅशनल स्पर्धा जर्मनी येथे होणार आहे. भंडारे यांच्या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक आबिनाश् कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर, खंडेराव धरणे , द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा यांनी सदर अंमलदारांचे अभिनंदन केले असुन पुढील कार्यास शुभेछा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: