नरखेड – नरखेड नगर मध्ये कुंभारपेठ व बाजारपेठ ला जोडणारा बंधारा कम पुल हा महत्वाचा दुआ आहे, या बंधाऱ्याचे बाजूला काही अंतरावर नवीन पुल निर्माण करण्याची मंजुरी 7 वर्षापूर्वी मिळाली व रीतसर त्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते नंतर सत्तांतर होऊन विरोधी पक्षाची सत्ता आली आणि कामाला ब्रेक लागला, 11/6/19 रोजीच्या न प च्या सभेत हा विषय घेऊन हा बंधारा कम पूल तोडण्याबाबत विषय होता.
ही माहिती जनतेला समजल्यावर काही लोकांनी निवेदन घेऊन सभेत नगरपरिषद अध्यक्ष यांना भेटले व नवीन पूल निर्माण होत पर्यंत हा बंधारा तोडू नये अशी विनंती केली अध्यक्ष व नगरसेवकांनी ती मंजूर करून नवीन पूल होत पर्यंत हा बंधारा तोडू नये असा ठराव क्रमांक 8 पास केला हा निर्णय झाल्यानंतर मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना तो पसंत नसावा म्हणून या ठरावाच्या विरोधात जाऊन दिनांक 19/ 6/ 2019 रोजी पहाटे 5 वाजता पोकलेन व जेसीबी घेऊन बंधारा कम पूल तोडण्यास सुरुवात केली याचा आवाज ऐकून परिसरातील लोक मोक्यावर पाहावयास गेले त्या ठिकाणी माधुरी मडावी आपल्या कर्मचाऱ्याच्या ताफ्यासह उपस्थित होत्या,
त्तत्कालीन उपाध्यक्ष अजय बालपांडे, गोपाल टेकाडे,राहुल गजबे यांना माहिती मिळाली ही मंडळी त्या ठिकाणी पोहोचली व हा पुल तोडू नका अशी विनंती केली पण माधुरी मडावी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहून जमा झालेली सर्व लोक अध्यक्षांना भेटण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात पोहोचले त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपस्थित नव्हते म्हणून याची तक्रार करण्याकरता सर्व लोक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले परंतु माधुरी मडावी यांनी 21 लोकांचे विरोधात खोटी तक्रार दाखल करून पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले,
कलम 143,147,149,186,135, भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व सरकारी पक्षाकडून आरोपीच्या विरोधात कोणत्याच प्रकारचे पुरावे सादर करू न शकल्याने नरखेडच्या न्यायमूर्ती श्रीमती व्ही डी शृंगारे यांनी सर्वश्री माजी नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, शामराव बारई ,मनोज कोरडे, अजय बालपांडे ,राहुल गजबे ,ओम खत्री, गोपाल टेकाडे, नईम कुरेशी, प्रशांत खुरसंगे, साहेबराव वघाळे, सचिन शेंडे ,धनराज खोडे, भारत आरमरकर ,नरेश वंजारी, सुधाकर ढोके ,जाकीर शेख ,सुदर्शन नवघरे, हरिकांत माळोदे ,उमेश सहगल, मदन कांमडे,सुरेश तातोडे यांची निर्दोष मुक्तता केली सरकारी पक्षातर्फे एडवोकेट राऊत साहेब तर आरोपीच्या वतीने एडवोकेट विवेक क्षीरसागर यांनी न्यायालयात बाजू मांडली.