Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीईस्लापूर येथील कथित मारहाण व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाही करणार...

ईस्लापूर येथील कथित मारहाण व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाही करणार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

पोलीस स्टेशन ईस्लापुर येथील कथित मारहाण प्रकरणात व्हॉयरल झालेल्या व्हिडीओ बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रेसनोट जारी झाली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकोटे यांनी नमूद केले आहे.

ईस्लापूर पोलीस स्टेशन मध्ये अर्धनग्न करून युवकांना मारहाण करण्यात येत असले बाबत चा एक व्हिडीओ (चित्रफित ) व्हायरल झाला आहे. सदरचा व्हिडीओ मध्ये सपोनि रघुनाथ शेवाळे पो.स्टे. इस्लापुर हे विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओ बाबत हिंदू संघटनांनी आवाज उठवीला आहे.

सदर व्हिडीओ बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांनी सदर घटने बाबत सत्यता पडताळणेसाठी तात्काळ कंधारचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. थोरात यांचे कडे सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी देण्यात आली असुन यामध्ये सखोल चौकशी करून काही तथ्य आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जारी केलेल्या प्रेस नोट मध्ये सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: