Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीटीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई...

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई…

नक्षल्यांनी पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले.

गडचिरोली – नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो.

दिनांक १४/०२/२०२३ रोजीचे ११:३० वा. चे दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोमकें कटेझरी हद्दीमध्ये कटेझरी – चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले असल्याच्या खात्रीशीर खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा मिळुन आला.

मिळुन आलेल्या साठ्यामध्ये २ नग जिवंत ग्रेनेड, २ नग ग्रेनेड फायर कफ, १८ नग वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लॅस्टीक डब्बा ( टुल किटसह), ४ नग वायर कटर, ७ नग ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ नग लहान लोखंडी आरी, २० नग नक्षल पुस्तके, ७ टु-पीन सॉकेट, १ स्टील डब्बा झाकणी व २ नग प्लॅस्टीक झिल्ली इ. नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले. २ नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोमकें कटेझरीच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: