न्युज डेस्क – देशातील सर्वात आधीची भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची अवस्था फारच वाईट असल्याचे अनेकांचं मत आहे, बरेच भारतीय खासगी दूरसंचार कंपनीची सेवा घेतात. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5G लाँच केले आहे आणि 6G साठी तयारी करत आहेत पण BSNL ने अजून 4G लाँच केलेले नाही.
बीएसएनएलची सेवाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, पण जेव्हा त्रास होतो तेव्हा फक्त बीएसएनएलच कामी येते. सियाचीन सारख्या भागात मोबाईल नेटवर्क बाबत नेहमीच समस्या होती पण आता बीएसएनएल (BSNL) ने ती संपवली आहे.
Siachen Warriors in collaboration with BSNL established the first ever BSNL BTS (Base Transceiver Station) at forward posts of the highest battlefield on 6th October to extend mobile communication for the soldiers deployed at more than 15,500 feet: Indian Army pic.twitter.com/BuhHKi3244
— ANI (@ANI) October 12, 2023
बीएसएनएलने सियाचीन वॉरियर्सच्या सहकार्याने पहिले BSNL BTS (बेस ट्रान्सीव्हर स्टेशन) 15,500 फुटांहून अधिक उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांना मोबाइल संप्रेषण करण्यासाठी सर्वोच्च युद्धभूमीच्या फॉरवर्ड पोस्टवर स्थापित केले आहे. भारतीय लष्कराने याला दुजोरा दिला आहे.