Wednesday, December 25, 2024
Homeराज्यश्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्यात प.पू. समाधान महाराज शर्मा यांचा वाढदिवस...

श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्यात प.पू. समाधान महाराज शर्मा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीत सध्या सुरू असलेल्या श्री राम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यात आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम कथेतील शबरी आणि राम भेटीचा प्रसंग प.पू.समाधान महाराज शर्मा यांनी उभा केला. आज प.पू. समाधान महाराज शर्मा यांचा 44 वा वाढदिवस असल्याने हजारो भक्तांच्या वतीने सोहळा समितीने फेटा, पुष्पहार तसेच शोभेच्या दारूची आतिषबाजी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी,

आमदार सुधीर गाडगीळ,सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदात उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष पन्नालाल त्रिवेदी, सचिव लक्ष्मण नवलाई, हार्दिक सारडा, खजिनदार ओमप्रकाश झंवर, अनिल मानधना, रोहित हिडदुग्गी आदि मान्यवरांसह संयोजक समिती सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: