कार्यक्रमादरम्यान वार्षिक निकाल जाहीर…
पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या व पंचक्रोशीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक 6 मे रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आली.
राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नविनचंद्र देवकर प्रमुख पाहुणे संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने, सचिव सचिन ढोण व प्रत्येक वर्गातील एक पालक या प्रमाणे पालकांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या संस्थात्मक कार्याची माहिती शाळेचे शिक्षक उद्धव काळपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कार्याची मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक निकाल देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक जे.डी कंकाळ शिक्षक सुनील राखोंडे,महादेव वाडेकर,प्रांजली कीर्तने, आशा नाभरे, साची ढोणे,नंदकिशोर इंगळे,श्रीकृष्ण शेगोकार,दिनेश करोडदे,पंजाब ननीर, देविदास राठोड, मदन ससाने यांच्यासह अनेक पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अरबाड यांनी केले तर आभार सचिन पाचबोले यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे कर्मचारी संदीप किरतकार, राजेश बावणे, विनोद काळपांडे यांनी परिश्रम घेतले.