चंद्रकांत गायकवाड, मालेगाव वाशिम
रिसोड : शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला हे मार्केट शेतकऱ्यांसाठी आहे की खरीदारांच्या मालाच्या संरक्षणाच्या साठी आहे. सोयाबीन, हरभरा, मुंग या पिकाचे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचा वटा लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण वटा हा रिकामा करून दिला होता.नंतर लगेच खरीदरांच्या थप्प्याच्या वाटेवर लागल्या.
आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाचे अवकाळी पावसामुळे नुकसान होते याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन आहे जानवी पूर्वक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन हा खरीप दरासाठी वाटा मार्केटचा वाटा हा राखीव ठेवतो असा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण हा होता शेतकऱ्यांच्या मालासाठी कधीच मोकळा नसतो शेतकऱ्यांचा माल असतो हा खरीदरांच्या मालासाठी राखीव ठेवला जातो त्यावर मात्र शेतकऱ्यांचा माल खरीदरांचा मालाची थप्पी असते या नुकसानीतून दिसून येत आहे याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन आहे. स्वाभिमान शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इढोळे पाटिल व स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी असा आरोप केला आहे.