Monday, December 23, 2024
Homeराजकीयपातूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती मध्ये प्रस्थापितांना हादरा; मतदारांनी दिली नवख्या गाव पुढार्‍यांना...

पातूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती मध्ये प्रस्थापितांना हादरा; मतदारांनी दिली नवख्या गाव पुढार्‍यांना संधी…

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची व सदस्य पदाची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी पार पडली होती . यामध्ये 33हजार 963एकूण मतदारांपैकी 28 हजार 244 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण पातुर तालुक्याचे 83.16 टक्के मतदान मतदान झाले होते.या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली होती.

पातुर तालुक्यातील 28 ग्रामपंचायती साठी 27 सरपंच पदाच्या जागेसाठी 152 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज भरले होते तर 183 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेसाठी 509 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते.

आज 20 डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत गुलाल उधळला व फटाक्यांची आतिषबाजी करीत शांततेत विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. सकाळपासूनच ग्रामपंचायतच्या निकालासाठी पातुर तहसीलवर सरपंच व सदस्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पातुर तहसीलवर मतमोजणीसाठी दहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली.

पातुर तालुक्यातील विजयी सरपंच पुढील प्रमाणे ग्रामपंचायत कार्ला रामराव सुदामा बोदडे सावरगाव बसंतीबाई राधेश्याम राठी पाडसिंगी शोभा काशीराम सरकटे खेट्री जहूर खान लाल खान सुकळी देवीताबाई सुपरांव अंभोरे बाभुळगाव मीरा संजय पाचपोर तांदळी खुर्द गजानन शालिग्राम महल्ले बोडखा विकास सुभाष वानखडे खामखेड नंदा विठ्ठल काळे नांदखेड कविता हरिदास माने आगीखेड गजानन काशीराम टप्पे नवेगाव गजानन धोंडू डाखोरे अंधारसांगवी अनिता साईनाथ देवकर चोंडी लक्ष्मी विष्णू ठाकरे वाहळा बुद्रुक,

उमा रमेश मोरे तुलंगा खुर्द सुजित दाभाडे पांगरताटी सीताबाई पंढरी चव्हाण झरंडी प्रीती समाधान जाधव गावंडगाव दिलीप शालिग्राम जाधव अंबाशी इंदुबाई ईसन दाभाडे आसोला बेलतळा सखुबाई विजय अवचार शेकापूर खापरखेडा सरिता संदीप पवार पिंपळडोली गंगासागर दिलीप ताजणे सोनूना प्रियंका उमेश सोनोणे जांब वैशाली पंकज चतरकर गोधळवाडी रिक्त माळराजुरा गणेश हरिचंद्र राठोड सावरखेड माया शिवाजी काटे आदींचा विजयी सरपंच उमेदवारांमध्ये समावेश आहे.

ईश्वर चिट्टी द्वारे दोन ग्रामपंचायत मध्ये दोन सदस्य झाले विजयी..पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत खामखेड येथे सदस्य पदासाठी वार्ड क्रमांक दोन मध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये संगीता श्रीकृष्ण व्यवहारे102मते व सोनाबाई किसन सोळंके यांना 102 या दोन्ही उमेदवारांना सम समान मते मिळाल्यामुळे ईश्वर चिट्ठी काढण्यात आली व यामध्ये सोनाबाई सोळंके ह्या ईश्वरचिठ्ठीद्वारे विजयी झाल्या आहेत.

तसेच खेट्री येथे वार्ड क्रमांक एक मध्ये सिद्धार्थ जानकीराम तिडके व शेख राजिक शेख पिरन या दोघांनाही 152 अशी समसमान मते मिळाली अखेर या दोघांमध्ये अंश मोहन काळे वय पाच वर्ष या लहान मुलांच्या हाताने सर्वांच्या समोर ईश्वर चीट्टी काढण्यात आली व यामध्ये शेख राजीक शेख पिरण हे विजयी झाले आहेत. मतमोजणीसाठी पातुर तहसील येथे 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदांच्या मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात आले होते.

तसेच पातूरचे तहसीलदार व निवडणूक अधिकारी दीपक बाजड यांचे मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार विजय खेडकर तसेच दहा निवडणूक निर्णय अधिकारी संजय अटक एपी लव्हाळे अंकुश ठाकरे विनीत ताले जयंत सोनोने उल्हास घुले श्रीमती इंद्रायणी थोरात नरेंद्र बढेरे योगेश जंगले श्रीमती दीपमाला भटकर यांनी तसेच भूषण बोर्डे प्रवीण जाधव दीपक पाटील संतोष तेलंगडे व कर्मचाऱ्यांसह शांततेत मतमोजणी शांततेत पार पाडली. मंगळवारी पातूर ते ठाणेदार हरिष गवळी यांचे मार्गदर्शनात पीएसआय हर्षु रत्नपारखी व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: