ऑनलाईन करण्यामध्ये शेतकरी स्तरावर पातुर तालुका हा डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये संपूर्ण राज्यात पहिला आहे….
आता नोंदणी तलाठी स्तरावर ६२ टक्के नोंदणी पूर्ण…
पातूर :जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात गावात साजरा स्तरावर मोठ्या प्रचारात व आवाहन करून.१ ऑगस्ट पासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. ३२ हजार ५५६ शेतकऱ्यांपैकी २७हजार ४१२ शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी केली असून. हे पाहण्याचे एकूण टक्केवारी म ८४.१९% टक्के शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर शेवटच्या दिवसापर्यंत ई-पीक पाहणी केली आहे. अतिवृष्टी किंवा अवकाळीच्या मदतीसाठी शासनाने ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे. यापुढील नोंदणी तलाठी स्तरावर होईल. जिल्हाभरात एकूण ई – पीक पाहणी ३ लाख ३२ हजार २२१ पैकी २ लाख 6 हजार ८२८ एकूण ६२.२६% एवढ्या शेतकऱ्यांनी जिल्हाभ ई पीक पाहणी केली आहे.
राज्य शासनाकडून २०२१ पासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची नोंद अॅपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती.
तर अनुदानाला मुकणार
ई पीक पाहणीच्या माध्यमातून पीक पेरा सातबाऱ्यावर उतरण्याच्या सूचना महसूल व कृषी प्रशासनाने शेतकऱ्यांना केल्या आहेत. जो शेतकरी ई – पीक पाहणी करणार नाही. त्याला पीक विम्यासह अन्य शासनाच्या आर्थिक लाभांना मुकावे लागणार आहे. पातुर तालुक्यात वर्षागणिक ई – पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदाही ई – पीक पाहणी १ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. शेतातील पिकांचा पेरा ऑनलाईन पद्धतीने सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ई – पीक पाहणी महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर ई-पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना पीकविमा आणि पीककर्जापासून वंचित राहावे लागणार आहे.