अकोला – अमोल साबळे
बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे विजांच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाने नया अंदुरा येथे वीज पडल्याने एक बैल ठार तर बैल गंभीर जखमी शेतातील पेरणी पूर्व कामे करून एक बैल ठार, तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे. नया अंदुरा येथील शेतकरी अत्यल्पभूधारक शेतकरी रामा सुखदेव मांगुळकार यांच्या मालकीची बैल जोडी आहे.
खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी शेतातील मशागतीच्या पेरणीपूर्व कामाला लागला आहे. अशातच मांगुळकार दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, रामा मांगुळकार यांनी पावसाला व विजेच्या खळखळासह पाहून शेतातील कामे सोडून घरी परतले दारासमोरील खुड्याला आपली बैल जोडी बांधून ठेवली.
पाऊस सुरू असतानाच जोरदार कडकडणारी वीज बांधलेल्या जनावरांवर पडली. यात एक बैल घटनास्थळीच ठार झाला, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला. यावेळी बैल दगावल्याने व दुसरा बैल गंभीर जखमी झाल्याने यावेळी या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी असा प्रश्न रामा मांगुळकार यांना पडला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे यावेळी वैद्यकीय अधिकारी व तलाठी सतीश कराड यांनी पंचनामा केला आहे.