सांगली – ज्योती मोरे.
गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये आपल्या जीवनातील पहिला गुरु आई, “आई माझा गुरु, आई कल्पतरू” हा आपला सामाजिक ,सांस्कृतीक वारसा पुढच्या पिढी ला देण्यासाठी नव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर मध्ये माता पालकांचे पाद्य पूजन व गुलाब फूल देवून आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम माता पालकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत शाळेतील सास्कृतिक विभाग प्रमुख सौ बबिता कांबळे मॅडम व धनश्री जोशी मॅडम यांनी केले. इयत्ता बालवाडी ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील पहिल्या गुरु आई विषयी व वेद व्यास मुनी यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमासाठी विजयनगर ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियंका माळी मॅडम उपस्थित होत्या . शाळेमध्ये वेदव्यास यांची प्रतिमा पूजन तसेच महाराष्ट्रीय बेंदूर निमित बैलाचे पूजन करून माहिती सांगण्यात आली. पालकांची मुलांकडून आपल्या आई चे पाद्य पूजन व गुलाब पुष्प देऊन पूजा करण्यात आली व या कार्यक्रमाला सर्वच माता पालनकांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली, काही माता पालकांनी आपल्या या कार्यक्रमा बद्दल उस्फूर्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.
गुरुपौर्णिमेचे महत्व व माहिती मराठी माध्यम चे मुख्यध्यापक श्री सुनील चौगुले सर यांनी दिली व शाळेतील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक श्री अस्लम सनदी सर यांच्या हस्ते देण्यात आले. सर्व कार्यक्रम शिक्षक, पालक यांच्या सहकार्याने उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. धनश्री जोशी मॅडम यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक नितीन बनसोडे सर, सौ मेघा मगदूम मॅडम, स्वाती माळी मॅडम , कु. धनश्री शेटे मॅडम, सौ. तनुजा पाटील मॅडम , सौ. गीतांजली पाटील मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सुरज फाउंडेशनचे संस्थापक मा. प्रवीणशेट लुंकड सर , सेक्रेटरी माननीय श्री. एन.जी कामत सर , माननीय सौ संगीता पागनीस मॅडम, कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.