महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्ह्यात दिवसोंदिवस गुन्हेगारी वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही गावठी कट्टे मिळत असल्याने ग्रामीण भाग ही आता सुरक्षित राहिला नाही स्थानिक गुन्हे शाखेने कांहींप्रमाणात या वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविला असला तरी अवैध धंदे मात्र मोठ्या प्रमाणात असून आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे दि 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील ढवळे कॉर्नर ते उस्माननगर रोड वर एच. पी. पेट्रोल पंप समोर येथे एक इसम स्वतःचे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी व्दारकादास चिखलीकर यांना स्टाफ रवाना करण्याबाबत आदेशीत केले. पो नि स्थागुशा यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार ढवळे कॉर्नर ते उस्माननगर रोड वर एच. पी. पेट्रोल पंप येथे रवाना केले.
स्थागुशा चे अधिकारी व अमंलदार यांनी ढवळे कॉर्नर ते उस्माननगर रोड वर एच. पी. पेट्रोल पंप येथे जावुन आरोपी नामे 1) शितीज प्रतापराव मोरे, वय 19 वर्ष, राहणार- टेळकी, ता. लोहा ह. मु. सिडको, नांदेड. यास पकडुन त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला लावलेले एक पिस्टल मिळुन आल्याने सदर पिस्टल (गावठी कट्टा) बाबत विचारपुस केली असता सदरचे पिस्टल 2) शुभम अनिलराव कदम, वय 21, राहणार- जानापुरी, नांदेड 3) संतोष प्रभाकर कदम, वय • 21, राहणार- डेरला, नांदेड यांनी दिल्याचे सांगीतल्याने ते जप्त करुन नमुद आरोपीविरुध्द पोउपनि / दत्तत्रय काळे यांच्या फिर्यादीवरुन पो स्टे नांदेड ग्रामिण येथे गु. र. नं. 482/2022 कलम 3/25 भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. नांदेड ग्रामिण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड , निलेश मोरे अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, पोह/सुरेश घुगे, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, तानाजी येळगे, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, दिपक ओढणे, सिटीकर, दासरवाड, चालक पो कॉ / हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.