Saturday, November 16, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटात आटा कम फकीर जादा…निवडून येण्याची...

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटात आटा कम फकीर जादा…निवडून येण्याची कुवत कोणत्या उमेदवारामध्ये आहे?…

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आणखी लांबल्यामुळे भावी आमदारांना आणखीन नोव्हेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत मतदार संघात खर्च करता करता शेती किंवा घर विकावे लागणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. या मतदार संघात सध्या पैश्याच्या उन्माद काही भावी उमेदवाराकडून सुरु असून मतदारांना आतापासूनच पैशाची चटक लावून दिली जात आहे तर काही उमेदवार आतापासूनच आमदार झाल्यासारखं वागत आहे. यावेळी मूर्तिजापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीतील शरद पवार गटात भावी उमेदवारांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला आहे. विशेष म्हणजे काही भावी उमेदवारांचा या मतदारसंघाशी कुठलाही संबंध नसून तरीसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. तर काही भावी उमेदवार अनेक दिवसांपासून तिकिटाच्या रांगेत असून सुद्धा काही नवीन आलेले हौशी उमेदवार त्यांच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ते लाखो रुपये खर्च करून आपल्याच तिकीट मिळणार या संभ्रमात आहेत. एखाद्या नवीन उमेदवाराला तिकीट जरी मिळालं तर निवडून येण्याची कुवत या उमेदवारांमध्ये आहे का?.

विशेष म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी पोषक आहे का? या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जेव्हा एकत्र होता तेव्हा तुकाराम भाऊ बिडकर या मतदारसंघाचे आमदार होते. आता हा पक्ष दोन गटात विभागल्याने मतदार सुद्धा विभागले गेले असतीलच. तर तुकाराम बिडकर यांना या मतदार संघात मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने मग शरद पवार गटापुढे मोठ आव्हान उभ ठाकणार आहे. तुकाराम बिडकर यांच्याकडे या मतदार संघाचा प्रचंड अभ्यास आहे. आणि तुकारामभाऊ ज्यांच्या पाठीशी असले म्हणजे अर्धी लडाई जिंकलीच समजा मात्र तुकाराम भाऊ आता अजित पवार गटामध्ये असल्यामुळे ते शरद पवार गटासाठी प्रचार करतील का?.

अजित पवार गटाचे काही नेते आपल्या गटाचा नव्या उमेदीचा उमेद्वारच्या प्रचाराला लागले आहेत. अजित पवार गट हा महायुतीचा भाग असल्यामुळे ते सुद्धा उमेदवारी मागू शकतात कारण महायुतीकडून कोणताही पक्ष या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी आग्रही नसून फक्त अजित पवार यांचा गट आपली उमेदवारी दाखवत असल्यामुळे महायुतीतील नेते हा मतदारसंघ मागू शकतात मात्र तसं होण्याची शक्यता कमीच आहे पण विद्यमान आमदाराचा मतदार संघात वाढता विरोध बघता शक्यताही वाटत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात होत असलेली भाऊ गर्दी पाहता पक्ष सुद्धा पेच पडला आहे की कोणाला तिकीट द्यावं? राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मस्त पाच वर्षाची मजा एकाच महिन्यात करून घेत आहेत. भावी उमेदवारांची पैशांची लूट करून त्यांच्या खिशाला चुना लावत आहे. मात्र भावी उमेदवाराला या मतदारसंघाचा कवळीचाही अभ्यास नसल्यामुळे अश्या नेत्याला बळी पडत आहे. गेल्या दहा पंधरा वर्षात मतदार संघात कोणती विकास कामे झालीत? आणि येणाऱ्या पाच वर्षात विद्यमान आमदार काय दिवे लावणार आहेत हे येथील जनता जाणून आहे. त्यामुळे यावेळेस येथील मतदार आता सुधारला आहे हे दाखवून देणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील एका सभारंभात चंद्र कसा वाढतो याची उपमा दिली होती. तर भावी उमेदवार याच आमदाराच्या संपत्तीचा थाट पाहूनच या मतदार संघाकडे आकर्षित होत असतील असा राजकीय विश्लेकांचा अंदाज आहे. तर काही भावी उमेदवारांचे आपल्या मतदार संघात चांगल्या सामाजिक कार्याने एक वेगळं नाव आहे आणि ते सर्वच समाजाला चालतात त्यांची निवडून येण्याची ताकदही आहे मात्र शहरातील काही भामटे नेते त्याचा विरोध करीत असल्याचे राजकीय विश्लेषकाचे म्हणणं आहे तो उमेदवार म्हणजे कोण?…..क्रमश

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: