मूर्तिजापूर – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, मुर्तिजापूर येथे सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या लोकअदालतमध्ये दिवाणी वाद व तडजोड करण्यायोगे फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत आणी पाणी देयके, ग्रामपचायत घरपट्टी व पाणी पटट्टी कराचे दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतमध्ये सुनावणीकरिता ठेवण्याकरिता मुर्तिजापूर न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणी सदर लोदालतीमध्ये सहभागी होवून आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. झेड .ए.ए.क्यू. कुरेशी, दिवाणी न्यायाधीश क.स्तर. मूर्तिजापूर आसीफ तांबोळी, सह दिवाणी न्यायाधीश क .स्तर मुर्तिजापूर यांनी केले आहे.
लोकअदालतीच्या निवाडयामध्ये अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टामधून कायमची सुटका होते. खटल्यामध्ये साक्षीपुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो यामुळे पैसे आणी वेळ वाचतो असे बरेच फायदे आहेत.