मूर्तिजापूर (प्रतिनिधी)
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव असून या मतदारसंघातून चर्मकार समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री भानुदास विसावे यांनी केले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित मुर्तीजापुर येथील अग्रसेन भवनात नुकत्याच संपन्न झालेल्या चर्मकार समाजाच्या मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश निरीक्षक श्री गजानन भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समाज मेळाव्याच्या व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरुजी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष श्री रामाभाऊ उंबरकर, जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण चोपडे, अकोला महानगर अध्यक्ष श्री शिवलाल इंगळे, जिल्हा महासचिव श्री सुनील गवई, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री भगवान बाविस्कर, या समाज मेळाव्याचे आयोजक, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मूर्तिजापुर तालुका अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत बोर्टा श्री पंकज ओंकारराव सावळे, श्री बाबारावजी खेडकर, श्री सुरेशराव तायडे,डॉ. राजीव जामठे, प्रा. डॉ. धनराज खिराडे, श्री अरुण गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
या समाज मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण चोपडे यांनी केले. प्रदेश युवा कार्याध्यक्ष श्री रामाभाऊ उंबरकर, महानगराध्यक्ष श्री शिवलाल इंगळे, जिल्हा महासचिव श्री सुनील गवई यांनी आपल्या मनोगतातून समाज मेळाव्याला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून संत रविदासांचे जीवन कार्य उलगडून दाखविले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री गजानन भटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक श्री पंकज ओंकारराव सावळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले. तसेच मुर्तीजापुर व बार्शीटाकळी तालुक्यात जवळपास 16 ते 17 हजार चर्मकार समाज असून मुर्तीजापुर विधानसभेमध्ये चर्मकार समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिक्षक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. वासुदेव डांगे यांनी तर आभार आयोजक श्री पंकज ओंकारराव सावळे यांनी मानले.
या चर्मकार समाज मेळाव्याला मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील चर्मकार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या चर्मकार समाज मेळाव्याच्या यशस्वीते करिता श्री अरुण माकोडे, श्री नंदू सावळे ,श्री शाम खंडारे, श्री साहेबराव मोहोकार, श्री प्रकाश गाठेकर,श्री राजकुमार नाचणे, श्री अजय सावळे श्री कोमल तायडे, श्री शंकर नाचणे डॉ.दावेदार, श्री प्रवीण धामणे जगन्नाथ भाऊ खेडकर सुभाष इंगळे संदीप ढाकरे डीगांबरभाऊ चंदन, श्रावण भाऊ दावेदार, अनंता वेरूळकर गजानन ढोकणे, मोहन सोनुले, गोपाल पेटकर आदींसह समाज बांधवांचे सहकार्य लाभले.