Sunday, November 17, 2024
Homeराज्यमाणगाव-रायगड मध्ये माउस डिअर उर्फ पिसोरीला जीवदान...

माणगाव-रायगड मध्ये माउस डिअर उर्फ पिसोरीला जीवदान…

पनवेल-रायगड – किरण बाथम

माणगाव मध्ये अनाकलनीय छोटासा प्राणी दोन दिवस शहराच्या गर्दीत शोधला जात होता. आज त्याला सुखरूप पकडण्यात आले.”माउस डियर” म्हणजेच मराठीत “मूषक हरीण” किंवा “पिसोरी” म्हणून ओळखेल जाणारे हरीण असल्याचे खात्रीपूर्वक कळले.

चारी दिशेने लोकवस्तीने गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात हे अत्यंत लाजरे हरीण पुराच्या पाण्यामुळे चुकून अडकून राहिले असल्याचे निदर्शनास आले व आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर आणि समोरील मुंबई-गोवा महामार्ग त्यामुळे हरिणाचा तात्काळ बचाव करणे गरजेचे असल्याने स्थानिक व गांधी परिवाराच्या मदतीनेच बचावकार्य सुरु करण्यात आले,

बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील प्रजापती यांच्या राजश्री एम्पोरियम या कपड्यांच्या दुकानात शिरले, तिथे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी अथक प्रयत्नांनंतर हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण १५ मिनिटे दुकानाच्या बंद खोलीत हरिणाला शांत ठेवले.

माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे देखील वनरक्षक वैशाली भोर,अनिल मोरे आणि वाहन चालक विवेक जाधव अश्या आपल्या टीम सोबत तात्काळ पिंजरा घेऊन पिसोरी हरीणाच्या सुखरूप बचावासाठी पोहोचले, हरिणाला दुकानातून पिंजऱ्यात सुरक्षितपणे ठेऊन लगेचच माणगांव पशुवैद्यकीय दवाखान्यात चाचणीसाठी नेह्ण्यात आले.

पिसोरी हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत योग्य त्या नोंदी व काळजी घेत साधारण ४ किलो इतक्या वजनाच्या पूर्ण वाढीच्या या मादी पिसोरी हरीणास जवळच्याच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. भारताच्या वन्यजीव संवर्धन कायद्यात पिसोरी हरिणाला शेड्युल एक मध्ये वाघा इतकेच संरक्षण प्राप्त आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: