Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीदलित नवरदेव घोडीवर बसल्याचा आला राग…गाव गुंडांनी केली दगडफेक…५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

दलित नवरदेव घोडीवर बसल्याचा आला राग…गाव गुंडांनी केली दगडफेक…५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

न्यूज डेस्क : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये दलित वराने घोडीवरून मिरवणुक काढल्याच्या रागातून वरातीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा Video सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

माहितीनुसार, दलित वराला घोडीवर पाहून गावकरी संतापले. त्यांनी वराच्या लग्नाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. मिरवणुकीत सुमारे 40-50 वराती सहभागी झाले होते. दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात 20 आरोपींची ओळख पटली आहे.

छतरपूरच्या बक्सवाहा पोलीस स्टेशन हद्दीतील चौराई गावातील सोमवारी संध्याकाळची ही घटना आहे. चौराई गावातील रितेश अहिरवार यांची मिरवणूक सागर जिल्ह्यातील शहागडकडे निघाली होती. अगोदर घोडीवर बसून वराची मिरवणूक गावात फिरायची अस ठरलं. गावातील प्रभावशाली लोकांनी त्यास विरोध केला. या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले. गावातील गुंडांनी आधी उद्धटपणा दाखवला आणि नंतर मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच एसपी अमित सांघी आणि एएसपी यांच्यासह दोन पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतरही दगडफेक थांबली नाही. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

त्यानंतर पोलिसांच्या देखरेखीखाली सायंकाळी उशिरा ही मिरवणूक शहागडकडे रवाना झाली. मिरवणुकीला पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यासह आयपीसी कलम 147, 148, 353, 149,332 294 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: