इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन…
अकोला – संतोषकुमार गवई
जलजीवन मिशन’मध्ये ग्रामीण भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्थेची निवड करण्यात येणार आहे. इच्छूक संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे. प्राथमिक सेवा सहकारी संस्थेचा स्थानिक स्तरावरील संपर्क लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा योजनांचे दुरुस्तीचे काम या संस्थांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात 412 प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार त्यातील 131 संस्था नफ्यात आहेत. संगणकीकरण प्रकल्पांतर्गत 412 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यात 348 संस्थांना संगणक, छपाईयंत्र, बॅटरी आदी यंत्रणा प्राप्त असून, डेटा भरणा वेगात सुरू आहे. संगणकीकरणामुळे सभासदांना खातेउतारा व इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कृषी सेवा संस्थांमार्फत नवीन 151 व्यवसायांचा अंतर्भाव आदर्श नियमावलीत करण्यात आला आहे. त्यात कॉमन सर्व्हिस सेंटर, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, धान्य भांडार व प्रक्रिया उद्योग, पीएम कुसुम योजना, प्रधानमंत्री किसान समृद्धी, शेतकरी उत्पादक गट व पाणीपुरवठा योजना देखभाल, दुरुस्ती आदींचा समावेश आहे.