धीरज घोलप
मुंबई उपनगर घाटकोपर “एन” प्रभागा क्रमांक 124 नवीन रस्ते कॉंक्रीकरणाचे काम करण्यापूर्वी नाले दुरुस्ती करताना वापरण्यात आलेले साहित्य, निविदा प्रक्रियेत गोंधळ , कंत्राट दारावरील मेहरनजर आणि अधिकाऱ्यांचा कंत्राकदारावरील वरदहस्त अशा अनेक नाट्यमय घडामोडीनी घाटकोपर “एन” प्रभाग क्रमांक 124 मध्ये नाले बांधकामाचा भोंगळपणा दिसत आहे.
घाटकोपर “एन” प्रभाग क्रमांक १२४ नाले दुरुस्ती करताना कुठेही उजव्या किंवा डाव्या बाजूला उत्कृष्ट दर्जाच्या जाड सळ्या लावण्यात आलेले नाही. त्यामुळे नाले बनवल्यानंतर या नाल्याला घुशी लागायला सुरुवात झाली आहे. भविष्याचा या नाल्यावरून वाहन गेले तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे असे दिसते की निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे.
पावसाळ्या पूर्वी नाले साफ केली जातात परंतु हे जे नाले बांधण्यात आले या नाल्याच्या ढाकणाची रुंदीकरण २×२ करण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात जर नाले साफ करण्याची वेळ आली तर ते नाले साफ करता येणार नाही कारण या नाल्यांच्या ठाकणाची रुंदीकरण खूप कमी असल्याने भविष्यात नाले योग्य पद्धतीने साफ करता येणार नाही.