दानापूर – गोपाल विरघट
वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी तेल्हारा तालुका/ सर्कल/ ग्राम शाखा कार्यकारणी करिता. खोडे प्रतिष्ठान दानापूर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
तेल्हारा तालुक्यातील दानापूर सर्कल कार्यकारणी गठीत करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी युवा तेल्हारा तालुकाध्यक्ष झिया शहा तालुका संघटक अनंता इंगळे माजी जि.प.उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, माजी सभापती संघपाल वाकोडे यांच्या नेतृत्वात संवाद बैठक घेण्यात आली.. भविष्यात येणाऱ्या नगरपालिका,ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त कशे निवडून येतील, त्यासाठी युवकांनी काय करायला पाहिजे.. यावर जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रकाश वाकोडे, विनोद तायडे, भगवान हागे, राजेंद्र चराटे, धम्मपाल वाकोडे, संदीप कांबळे, संतोष हागे, सुमेध वाकोडे, सदानंद खंडेराव,अत्तर सौदागर ,असलम खा. शेख सलीम ,तनवीर सौदागर तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल विरघट यांनी केले.