नरखेड – अतुल दंडारे
दिनांक 12/06/2023 ला मा.अप्पर आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर न्यायालय अंतर्गत अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1)नुसार कार्यवाही अंतर्गत सरपंच ग्राम पंचायत सावरगाव कु. प्रगती ढोणे यांना सरपंच व सदस्य पदावर राहण्यास अपात्र केले.
कु.प्रगती ढोणे अपात्र ठरल्यामुळे अप्पर आयुक्त माधवी खोडे चवरे यांचे पत्रानुसार कार्यवाही करत गट विकास अधिकारी पंचायत समिती,नरखेड डॉ. निलेश वानखेडे यांनी ग्राम पंचायत सावरगाव येथील प्रशासकीय कार्यभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 38 नुसार ग्राम पंचायत सावरगाव चे उपसरपंच राजू मोतीरामजी गिरडकर यांना पुढील आदेशापर्यंत सरपंच पदाचा कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे पत्र ग्राम पंचायत सावरगाव चे सचिव अजय नितनवरे यांना दिले.
त्या अनुषंगाने सावरगाव ग्राम पंचायत चे उपसरपंच राजू गिरडकर यांना प्रभारी सरपंच म्हणून ग्राम पंचायत सावरगाव चा पदभार आज दिनांक 14/06/2023 ला स्विकारला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजू रेवतकर,मंगेश दाढे,विजय पाटील,नागरिक हिम्मत नखाते,जयपाल शेंबेकर,सुरेश रेवतकर,सहदेव वैद्य,हिरू रेवतकर,रमेश रेवतकर,कुमार पल्हेरिया,धनराज ठोंबरे, ललित तांदळे,प्रफुल दारोकर,अविनाश ठोंबरे,गंगाधर रेवतकर,जयंत गिरडकर,सचिन भोंगाडे आदि उपस्थित होते.