रामटेक – राजु कापसे
पंचायत समीती रामटेक येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असलेले अशोक उईके हे नुकतेच ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पंचायत समीती रामटेक च्या वतीने जंगी सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांनी एकुण ३५ वर्ष ९ महिने २२ दिवस सेवा दिलेली आहे.
अशोक लटारुजी उईके असे त्यांचे पुर्ण नाव असुन अवघ्या २१ व्या वर्षीच ते शाशकीय नोकरीत रुजु झाले होते. १९८७ ला त्यांची जॉइनिंग असुन त्यांची पहीली पोस्टींग ही खापा या गावी सहाय्यक शिक्षक म्हणुन होती. त्यानंतर त्यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी व शेवटी प्रभारी गट शिक्षण अधिकारी अशाप्रकारे पदोन्नती होत गेली.
नोकरी कार्यकाळात त्यांना सन २००७ ला आदर्श शिक्षक म्हणुन जिल्हा पुरस्कार तथा पथरई गावातील शाळेत कार्यरत असतांना जिल्हा व राज्य पुरस्कार मिळालेला होता हे विशेष. २०२१ ते फेब्रुवारी २०२३ ला ते शिक्षण विस्तार अधिकारी व शालेय शिक्षण आहार अधिक्षक या पदावर कार्यरत होते.
सेवानिवृत्तीच्या वेळी ते प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीच्या दिवशी म्हणजेच ३१ मे ला पंचायत समीतीमध्ये त्यांचा सेवानिवृत्तीपर जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये बी.डी.ओ. जयसिंग जाधव, सभापती संजय नेवारे, सहाय्यक बी.डी.ओ. मते, गटशिक्षण अधिकारी भिवापुर तथा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय कोकोडे , गटशिक्षण अधिकारी तभाणे मॅडम,
शिक्षण विस्तार अधिकारी शालीनी रामटेके, चंद्रकांत कोडवते पं.स. सदस्य, शेखर खंडाते सरपंच पिपरिया, दुर्गाताई सरीयाम माजी समाज कल्यान सभापती आदी. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख आणि गटसमन्वयक रामनाथ धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाची धुरा जगदीश इनवाते तालुका अध्यक्ष सेना व देवराव सरोते मोरर पोलीस मुख्यालय नागपुर यांनी सांभाळली.