Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर तालुक्यातील बेलुरा येथे नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ...

पातूर तालुक्यातील बेलुरा येथे नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ…

दोन दिवसांपासून होता बेपत्ता ; घातपाताची शक्यता

दि.08/10/2022
पातूर : तालुक्यातील बेलुरा येथे नदीत एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. आज दि.08 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास पातूर तालुक्यातील बेलुरा येथे नदीत एक वयोवृद्ध इसम मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले माहिती पातूर पोलिसांना मिळाल्यावरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन्ही बाजूने 18 ते 20 फूट उंच कडा असलेल्या नदीपात्रातील कपारीमध्ये सदर इसम मृतावस्थेत असल्याचे आढळून आले.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या बघ्यांच्या गर्दीपैकी मदतीसाठी एकही पुढे नं आल्याने पातूर पोलीस स्टेशनचे मोहन भारस्कर, संबोधी इंगळे,वाडेगाव चौकीचे विनायक पवार,गावंडे यांना मृतदेह नदीपात्रातुन बाजूला असलेल्या शेतात आणून तेथून 50 मीटर रोडपर्यंत उचलून नेण्यास बरीच कसरत करावी लागली.

सदर मृतक डिगांबर बळीराम नाकट (वय अंदाजे 60 वर्ष) रा.तांदळी खुर्द असल्याचे निष्पन्न झाले असून दोन दिवसांपासून बेपत्ता असूनही हरवल्याची तक्रार दाखल नसल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात असून पातूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला.अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: