Saturday, November 16, 2024
HomeMarathi News Todayअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाऊ गर्दीतून कुणाची वर्णी लागणार?…

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाऊ गर्दीतून कुणाची वर्णी लागणार?…

अकोला : नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम अकोला मतदार संघात कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आशा बळावल्या असून यावेळी हमखास भाजपला मात देणार असल्याच राजकीय तद्न्य सांगतात. त्यामुळे या मतदार संघासाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मतदार संघात काँग्रेसकडून लढण्यास १९ लोकांची यादी असल्याचे बोलल्या जाते. मात्र यातील प्रभावी उमेदवार किती? तर काही मोजकेच उमेदवार आहेत जे या मतदार संघात प्रभावी ठरू शकतात.

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ हा भाजपचा गढ असून मात्र लोकसभेच चित्र बघता हा मतदार संघ आता भाजपसाठी अनुकूल राहिला नाही. या मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षाकडूनही बरेच इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. मात्र हा मतदार फक्त भाजपकडे जाणार आहे. तर महाविकास आघाडीकडून हा मतदार संघ हमखास काँग्रेसच्या वाट्यावर येणार असल्याचे नक्की झाल्यामुळे कॉंग्रस कडून इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा थोड्या फरकाने पराभव झाला होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीत अभय पाटलांची जादू मोठ्या प्रमाणात चालल्याने यावेळी विधानसभेसाठी कॉंग्रेस पाटील, मराठा समाजातील उमेदवार देणार असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे. यामध्ये मतदार संघातील तीनचार मराठा नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये अभय पाटील आणि अन्नपूर्णेश पाटील या नावासह इतर नावांची चर्चा सुद्धा होत आहे. मात्र पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की मराठा सोडून इतर दुसर्या समाजातील लोकांना संधी देणार. मागील वेळेस या मतदार संघात मुस्लीम समाजातील उमेदवार दिला होता मात्र यावेळेस पक्ष गैरमुस्लिम उमेदवार देण्याचा तयारीत असल्याचे बोलले जाते. पक्षाने जर मुस्लिम चेहरा दिल्यास भाजपच्या वतीने खेळी करून त्याच समाजातील अनेक उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी भाजप करीत असून, मुस्लिमांची मते गोठविण्याचा प्लॅन तयार असल्याचे समजते.

तर इच्छुकांच्या रांगेत सध्या लोकसभेचे उमेदवार अभयदादा पाटील यांच नावही स्पर्धेमध्ये आहे तसेच अन्नपूर्णेश पाटील,माजी महापौर मदन भरगड, माजी आमदार बबनराव चौधरी,प्रदीप वखारीया, आकाश कवडे, उद्योगपती रमाकांत खेतान, विवेक पारस्कर, विलास गोतमारे, प्रदेश सचिव व माजी नगरसेवक विभा राऊत, चंद्रकांत सावजी, तपसू मानकीकर, तर मुस्लीम उमेदवारांमध्ये साजिदखान पठाण, माजी नगरसेवक झिशान हुसेन, डॉ. शफिक अहमद, माजी नगरसेवक शाहीन अंजुम, प्रदेश सचिव अब्दुल जब्बार, आजाद खान, माजी नगरसेवक नौशाद खान असे १९ लोक इ निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र यावेळी या मतदार संघात स्वच्छ प्रतिमेचा, जनमानसात नाव असलेला समाजसेवक अश्या उमेदवाराची वर्णी लागणारा असल्याचे बोलले जाते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: