प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा…
अकोला: अमरावतीनंतर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अकोल्यात महायुतीला धक्का दिला आहे. प्रहारच्या अकोल्यातील पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केली. प्रहारच्या या धक्का तंत्रामुळे अकोल्यातील समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाच्या वतीने नेहमीच गैरफायदा घेतला जातो अमरावती मध्ये नवनीत राणा व रवी राणा यांनी नेहमीच प्रहार वर व आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात चिखल फेक केली आहे त्यामुळे प्रहार पक्षाच्यावतीने अकोल्यात भाजपाचा प्रचार केला जाणार नाही तर प्रहारच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देऊन प्रहार पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करणार असल्याचे पत्रकार परिषदेतून पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर देखील त्यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली त्यानंतर आमदार बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले होते भाजपाला शक्य त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे समर्थकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे अमरावतीनंतर अकोल्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून अमरावती नंतर आता अकोल्यातही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महायुती विरोधात दंड थोपटल्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे