Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीभीषण अपघातात एकाच परिवारातील ५ जणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी...मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील...

भीषण अपघातात एकाच परिवारातील ५ जणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी…मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घटना…

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत, मध्यरात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच परिवारातील 5 जण ठार झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची महिती एका वाहन चालकाने पोलिसांना दिल्याने लवकर त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री १२ चा सुमारास पुण्याहून मुंबईकडे जात असताना इरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने हा भयानक अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. या गाडीत एकूण 7 लोक होते. यातील 5 जणांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर चौघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमीही झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला वाचली असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेतील सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की धडक होताच गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. यात गाडीचा दरवाजा तुटला आणि आतील प्रवाशी बाहेर पडले. या घटनेत अतिरक्तस्त्राव झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची ओळख अजून पटली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: