Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमीचा अखेर मृत्यू...

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमीचा अखेर मृत्यू…

धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान…

पातूर – निशांत गवई

पातूर रोडवरील धनेगाव फाट्यानजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे या अपघातात २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. यातील जखमी मोरगाव सादीजन येथील विनायक किसन कवर (५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पातूर येथील सुरेश बोचरे हे फुलाचा व्यवसाय करतात. ते सोयरीक संबंधासाठी व फुलांची उधारी वसुल करण्यासाठी त्यांचे नातेवाईक विनायक कवर (५२) रा. मोरगाव सादीजन यांच्यासोबत दुचाकी क्र. एम. एच. ३० बी. एम. ५८०५ ने गुरुवारी दि.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या घरी बाळापूरकडून पातूरकडे जात होते. धनेगाव फाट्यानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात ते स्वतः आणि विनायक कवर हे गंभीर जखमी झाले होते. मात्र धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते. काही वेळानंतर नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीना अकोला येथिल दवाखान्यात रवाना केले होते. यातील गंभीर जखमी विनायक कवर रा. मोरगाव सादिजन यांचा मृत्यू झाला असून, आता अज्ञात वाहनाचा शोध लावण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: