Friday, November 22, 2024
Homeमनोरंजन२०२५ मध्ये ‘भूपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार... 

२०२५ मध्ये ‘भूपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार… 

या घनदाट जंगलातलं त्यांच राज्य… “देवभूमी”…

जेंव्हा-जेंव्हा शत्रूने चाल केली

तेंव्हा-तेंव्हा त्यांना यमसदनी धाडलंय. तोच… पुन्हा येतोय…!!!

भूपती येतोय इतिहासातलं सुवर्णपान रुपेरी पडद्यावर

मुंबई – गणेश तळेकर

असं म्हणतात कि, ‘उद्या’साठी तुम्हाला ‘काल’ माहिती असणं फार गरजेचं आहे. इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच असते. पुस्तकातून, ऐकिव आख्यायिका, कागदपत्र इ. मग तो जगाचा, देशाचा, प्रदेशाचा किंवा एखाद्या राजघराण्याचा इतिहास का असेना..! रंजकता असेल तर मनापासून ऐकलेल्या त्या ऐतिहसिक गोष्टी कायम आपल्या स्मरणात राहतात.

तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भूतकाळात जाऊन संशोधन करतोय म्हणूनच शेकडो, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजकाल आपल्याला समजतोय. खरंतर खूप मागे जाऊन हे संशोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक महत्त्वाचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रा.लि.यांच्या आगामी ‘भूपती’ या मराठी चित्रपटातून होणार आहे.

नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचे आकर्षक पोस्टर आणि मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत. ‘हजारॊ वर्षांपासूनच या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी… जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलंय… तोच पुन्हा येतोय..! असा भारदस्त आवाज आणि ऐतिहासिक वास्तूमधील एक दिव्यमूर्ती ‘भूपती’च्या मोशन पोस्टरमध्ये पहायला मिळते आहे.

इतिहासातील एक सुंदर गोष्ट जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच मनोरंजन व सामाजिक प्रबोधन ‘भूपती’ या चित्रपटातून होईल याची मला खात्री आहे, असं दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले.

जगाच्या पाठीवर सर्वप्रथम जी वास्तू निर्माण झाली व पुढे त्याच्यासारख्या अनेक वास्तू निर्माण करून त्यांच्या मदतीनेच आपल्या पूर्वजांनी जो दैदीप्यमान इतिहास घडविला, त्यातलंच एक सुवर्णपान म्हणजे ‘भूपती’.

लेखक आणि दिग्दर्शक : दिनेश जगताप

निर्माता : यशराज जगताप

प्रॉडक्शन हाऊस: दिनीशा फिल्म्स प्रा. लि.

DoP: मंगेश गाडेकर

PR: Media One PR | गणेश गारगोटे

प्रसिद्धी डिझाइन आणि डिजिटल मार्केटिंग: लोकी स्टुडिओ (Loki’s Studio)

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: