गडचिरोली :- 2 जानेवारी
सिरोंचा येथील गाजत असलेल्या हिंदू देवी देवता बद्दल आक्षेपार्ह टिपणी प्रकरण अहेरी उपविभागात व संपूर्ण तेलंगणा राज्य पेटून उठल आहे. या प्रकरणात फुले-शाहू- आंबेडकर महोत्सवाच्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात यावी . या मागणीसाठी आज अहेरीतील हिंदू बांधव एकत्रित येऊन अहेरीतिल बाजारपेठ बंद पुकारला.या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला तसेच तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सिरोंचा येथे दिनांक 24- डिसेंबर ते 25 डिसेंबर रोजी मिलींद बहूद्देशीय विकास मंडळ व नांलदा चॉरेटेबल ट्रस्ट् सिरोंचा च्या वतीने फुले शाहू आंबेडकर वार्षिक महोस्तव कार्यक्रमाचे मोठे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात हिंदू धर्मा बद्दल कोणतेही अपशब्द वापरू नये या करिता बजरंग दल व विश्व हिंदू परिषद कडून सिरोंचा पोलीस निरिक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आली होते. त्या नंतर सदर कार्यक्रमात वक्ता म्हणून नरेश बैरी यांनी 25 डिसेंबर ला हिंन्दू धर्म व हिंदू देवी देवतांन बद्दल आक्षेपार्ह असे विधान केले.
सदर बाबीवर लवकरात लवकर आयोजकांवर नरेश बैरी,व्यंकटी दुर्गम,सखाराम झोडे,शंकर बोरकुटे,बालाजी बोरे, शंकर कावरे,या सर्व कारणीभूत व्यक्तींना तात्काळ अटक करून गुन्हा नोंदविण्यात यावा अन्यथा पुढे अधिकाधिक तीव्र आंदोलन करण्यात येथील त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा निवेदनाद्वारे करून कारवाई करण्यात यावा व आयोजका मध्ये काही दोषी शासकीय नौकरीत आहेत.सखाराम झोडे हा व्येक्ती केंद्र प्रमुख आणि शिक्षक आहे असे शिक्षक समाजात विष का शिक्षण देतील त्यामुळे भावी पिढीकरिता हे हानिकारक असल्याने अशांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. या मागणीसाठी अहेरी येथील हिंदू संघटनांनी शहर बंद पुकारला होता त्या पार्श्वभूमीवर अहेरीतील बाजारपेठ संपूर्ण बाजारपेठ 100% बंद होती. या बंदला सर्व व्यापारांनी आपल्या शंभर टक्के बंद ठेवून या बंदला यशस्वी केले.
या घटनेचे अधिक तपास सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांचा सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षिका शितल धविले करिता आहे.