समस्त मराठा समाज बांधवांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…
खामगाव – हेमंत जाधव
मराठा समाजाला लिजवर मिळालेल्या जागेवर काही लोकांनी टिनाचे कंपाउंड व पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. तरी हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा नगर पालिके समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने एका निवेदनातून देण्यात आला आहे. या संदर्भात काल २४ मार्च रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यात नमूद आहे की, स्थानीक पत्रकार भवन जवळील नगरपरिषदेच्या मालकीची असलेली सर्वे नंबर २०५ ते २०६ मधील जागा मराठा समाजाला नाममात्र भाडेपट्ट्याने देण्यात आलेली आहे. मात्र काही लोकांनी सदर जागेवर टपरी व टीनाचे कंपाउंड तसेच पक्के बांधकाम करून अवैधरित्या अतिक्रमण केले आहे. यामुळे मराठा समाजाला सामाजिक उपक्रमाकरिता ही जागा विकसित करण्यास अडचण निर्माण होत आहे.
तरी सदर अतिक्रमण त्वरित काढून ही जागा मोकळी करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 31 मार्च पूर्वी सदर जागेवर अतिक्रमण न काढण्यास समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने नगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, व उपविभागीय महसूल अधिकारी खामगाव यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदन देतेवेळी संजय शिनगारे, रामदादा मोहिते, गणेश माने, रमाकांत गलांडे, सुरेश घाडगे, किशोर भोसले, रामभाऊ बोंद्रे, डीगंबर गलांडे, आनंद पवार, शैलेश सोले, रवी शिंदे, किशोर गरड, गणेश जाधव, संजय अवताडे, रवींद्र(बंडू) घाडगे, सुभाष शेळके, संभाजी बोरकर, राजू मुळीक, गजानन मुळीक, शेषराव खोसे, पांडुरंग भोरे, श्रीकांत राऊत, मयूर घाडगे, राहुल घाडगे, गजानन बागल,शिवाजी मोहिते, अशोक आनंदे, राजेंद्र इंगळे, बंटी ढास, शशी वखरे, राजेश बोरकर,राजेंद्र काळे, किशोर होगे,
साहेबराव वाशिमकर,राजीव काटकर, आशिष शिनगारे,विलास कदम, नितीन प्रभाकर केवारे, नितीन पोकळे, आकाश शिंदे, कैलास कदम,श्रीकांत माने, गजानन कापले,दिनेश लबडे, विक्की रेठेकर, शेषराव सोसे, बाळू पुरी, संतोष येवले, आसाराम सोले, नितीन शिंदे, संजय शिंदे, सोनू राऊत,शिवाजी सोले, बाळू ढास,बाबा जोगदंड,गोपाळ गंडाळ, शैलेश लांडगे,मोहन मोरे, उमेश भराटे, कुणाल चव्हाण, शशिकांत अतकरे, विजय शिंदे, आकाश खरपाडे, प्रवीण ठाकरे, महादेव फंड, आदींची उपस्थिती होती.