Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यमूर्तिजापुर | रब्बी हंगामातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा...

मूर्तिजापुर | रब्बी हंगामातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा…

शेतकरी संघटना जिंदाबाद…

मूर्तिजापुर तालुक्यात नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हरबरा, गव्हू, तूर पिकाचे नुकसान झाले असुन त्याचा पंचनामा सुधा झाला होता तालुक्यातिल काही शेत शिवारातील नुकसानाचे पैसे जमा झाले vk नंबर सुद्धा आला परंतु वहीतपूर शिवारातील नुकसानग्रस्त शेतकर्याची यादि अध्यापपर्यंत अपलोड न केल्यामुळे वहीतपूर शिवारातील शेतकर्याचे vk नंबर आलेला नाही.

तसेच यलोमोझक,25% पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झाले नाही.शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आज मूर्तिजापूर तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार मॅडम यांनी बाजू समजून घेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आस्वासन दिले.

निवेदन देते वेळी शेतकरी संघटनेचे नेते श्री सुरेश भाऊ जोगळे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अरविंद तायडे,उपसरपंच रणजित तायडे, प्रदीप डांगे,गुलाबराव मसाये,पंकज वानखडे, अमोल तायडे, दत्ता तायडे,ग्रामपंचायत सदस्यां मीनाताई तायडे, दुर्गाबाई वासनिक,पप्पू तायडे, गजानन तायडे, सागर तायडे, अंकुश तायडे, रमेश गांवडे, अशोक तायडे, आयुष तायडे,राजू तायडे, सागर तायडे, प्रवीण जाणोरकर, तुकाराम मराठे, प्रल्हाद राऊत व बरेच शेतकरी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: