नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी पात्रातून रात्रंदिवस अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याने या चोरटी वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने रेतीची चोरटी वाहतूक करणारे 13 वाहने व 59ब्रास रेती असा एकूण एक कोटी पस्तीस लाख पासस्ट हजार रुपयांचा मु्देमाल जप्त केला आहे.
अवैध्य रित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनावार कायदेशिर कडक कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 11 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि संतोष शेकडे, पोउपनि मिलींद सोनकांबळे,पोउपनि साईनाथ पुयड यांचे सोबत पोलीस अमंलदार देवुन वेगवेगळी तीन पथके नेमुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहना कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार दिनांक 12 जून रोजी स्थागुशाचे सपोनि संतोष शेकडे, पोउपनि मिलींद सोनकांबळे, पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, विमानतळ, वजीराबाद हद्दीत पेट्रोलींग दरम्यान मौजे भनगी येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे 08 हायवा, 04 टिपर व 01 टेम्पो असे एकुण 13 वाहने, 59 ब्रास रेती असा एकुण 1,35,65,000/- (एक कोटी पस्तीस लाख पासस्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आला असुन स्थागुशाचे तिन्ही पथकांचे अधिकारी यांचे फिर्यादीवरुन नमुद वाहनांचे चालक व मालक यांचेविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.