मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
दुचाकीने देशी-विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीवर नाकेबंदी करून माना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दुचाकी, देशीदारू असा एकूण ५९ हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या कारवाई दोन आरोपींला अटक करण्यात आली.
माना पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्याचे पथक पोलिस स्टेशन परिसरात कुरुमच्या बस थांब्यानजीक पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान मुखबीराकडून खबर मिळाली की, एमएच २७ ऐझेड ५६०७ या क्रमांकाच्या दुचाकीने कुरुम येथून देशीदारूचा माल अवैधरीत्या घेऊन परिसरात जात होते.
सदरच्या माहितीवरून बस थांब्यावर नाकेबंदी करून प्रो. रेड केली असता आरोपी रागुला (२५, रा. तेलंगणा ह.मु. कुरुम ) सतीश अशोक अंभोरे (२२ , रा. कुरुम )यांच्या ताब्यातून ४२० नग क्वार्टर देशीदारुसाठा किंमत १८ हजार ९०० दुचाकी किंमत ४० हजार, असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त केला.
सदरच्या आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन माना येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक बच्चनसिंह , अपर पोलीस अधीक्षक डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरज सुरोशे, पो.उपनि गणेश महाजन,सहा पो.उपनि राजेंद्र वानखडे , जमादार उमेश हरमकर , गृहरक्षक दलाचे सैनिक रामदास बावनकर ,दिलीप वाडेकर , अशपाक खान आदींनी केली.