वन कर्मचारी वसुलीत सुस्त
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मेडशी जवळच असलेल्या कोलदारा शिवारात एका ठिकाणी 20 ते 22 सागवान झाडे विना परवानगी कत्ल करण्यात आली आहेत.वनविभाग मात्र या गोष्टी पासून अनभिज्ञ आहे.
सविस्तर असे की मेडशी परिसरात कोलंदारा शेत शिवारात एका ठिकाणी 20 ते 22 सागवान झाडे कापून टाकण्यात आली आहेत हे झाडे कोणाच्या मालकी हक्काची आहेत की वनविभागाच्या अखत्यारीतील आहेत अजून समजू शकले नाही कोळदरा शिवारात एका ठिकाणी विहीर खोदण्यात येत असून ही विहीर खोदण्या साठी येणाऱ्या मशीन साठी ही झाडे कापण्यात आल्याची चर्चा आहे काही झाडे तर या मशीन ने मुळा सगट उपटून फेकल्याचे दिसत आहे.
हा सर्व प्रकार वनविभागातील एका कर्मचाऱ्या ला माहिती असून या प्रकरणा मध्ये एका मध्यस्था च्या हातून आर्थिक तडजोड करुन मशीन सोडून देण्यात आल्याची जोरदार चर्चा मेडशी व परिसरात आहे सागवान झाडाच्या अवैध तोडणी बाबत वनविभाग अनभिज्ञ कसा ?
घटना स्थळा वर जाऊन आर्थिक तडजोड करून मशीन सोडून देणारा कर्मचारी कोण? असे अनेक सवाल मेडशी व परिसरातील नागरिकांच्या मनात घर करत आहेत या सर्व प्रकार बद्दल वनविभाग तील अधीकारी काय कारवाई करतात या कडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. व मेडशी परिसरात अवैध आठजात कत्तल पण जोमात सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष देण्याची गरज.