बल्लारपूर – नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर तालुक्यात अवैद्य धंद्यांनी थैमान घातले असून अवैद्य दारू,सट्टा,जुगार,लोहा चोरी,कोळसा चोरी सर्रास सुरु असल्याने येथील पोलीस यंत्रणा काय करित आहे?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर, नांदगाव (पोडे), पळसगाव, हडस्ती, कळमना, मानोरा, आमडी, कोर्टिमक्ता, किन्ही,गिलबिली बाम्हणी या प्रमुख ग्रामपंचात असलेल्या गावात बल्लारपूर येथील वाईन शॉप वरून देशी विदेशी दारू पोहचती करून विक्री केली जात आहे.
शहरात अनेक इमारतीत दिवाळीचे निमित्त पुढे करून लाखों रुपयांचा जुगार सुरु होणार असल्याची विश्वासनीय माहिती आहे.दरम्यान जुगार भरवणाऱ्यांनी “सेटिंग अधिकाऱ्यांशी” साठेलोटे करून अलिखित परवानगी मिळवल्याची चर्चा आहे.तर दारू बंदी उठल्या नंतरहि शहरातच नव्हे संपूर्ण तालुक्यात अवैध दारू विक्रीने नागरिक व ग्रामीण हैराण झाले आहेत…
चौक्का चौकात सट्टा पट्टी,गल्लो गल्लीत दारू भट्टी..?
बल्लारपूर शहराची परिस्थिती भिषण असून शहराच्या प्रत्येक मुख्य भागात सट्टापट्टी आणी गल्लोगल्लीत अवैद्य दारू विक्री सुरु आहे.दरम्यान या सर्व अवैद्य धंद्यांना पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ पाठींबा असल्या शिवाय हे अवैद्य धंदे सुरु राहूच शकत नाही,असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणेदार ओंबासे ,उमेश पाटील यांनी केला होता उन्हेगारांचा सुफडा साफ…
तत्कालीन ठाणेदर यशवंत ओंबसे यांच्या नंतर उमेश पाटील या तालुक्याला शिस्तप्रिय ठाणेदार म्हणून लाभले होते.यांच्या कारकिर्दीत अवैद्य धंदेवाले अंडरग्राउंड झाले होते.अनेकांना तडीपार करण्यात आले होते.तर यांच्या पोलिसी ख्याक्याने अनेक गुंडांनी बल्लारपूर शहर सोडून इतरत्र पलायन केले होते हे विशेष..!
विद्यमान ठाणेदार सुनील गाडे अनभिज्ञ..?
दरम्यान विद्यमान ठाणेदारांनी अनेक तलवारबाज पकडून त्यांच्यावर शास्त्रासह कडक कार्यवाही केली आहे.ते सक्षम अधिकारी सिद्ध होत असले तरी त्यांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांच्या नकळत अवैद्य धंद्यांना छुपी परवानगी देऊन “वसुली मलिदा” खाणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी,अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.