पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम मळसुर येथे खुलेआम अवैध धंदे सुरु असून याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने या अवैध धंद्यावाल्याचे फावलेले असून खुलेआम अवैध धंदे सुरु आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे कि पहाडसिंगी मार्गवर खुलेआम वरली मटका सुरु असून ग्रामीण नागरिक आपले मोलमजुरी चि कमाई,
या वरली मटक्यात गमावत असून तसेच मळसूर या गावात अवैध दारू विक्री सुद्धा होत असून दिवसाढवड्या सरेआम चान्नी पोलिसांच्या नाकावर टिच्चून देशी दारू चि वाहतूक होत असून या अवैध धंद्या वर चान्नी पोलीस अर्थपूर्ण कारवाई करत नसल्या चि चर्चा चान्नी परिसरात आहे.
अवैध धंद्याबाबत सुजाण नागरिकांनि माहिती द्यावी त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करून अवैध धंद्यावर अंकुश लावू योगेश वाघमारे (ठाणेदार चान्नी )