Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई वडीलांचे कष्ट व त्याग विसरु नका....

जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई वडीलांचे कष्ट व त्याग विसरु नका. – आ.अमित झनक…

मालेगांव येथ मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्यामागे अतिशय एकाग्रतेने वाटचाल केल्यास भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे चांगलं यश मिळू शकते. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई-वडिलांनी घेतलेले कष्ट , परिश्रम व त्याग डोळ्यासमोर ठेवावेत. त्यामधूनच आपल्या आयुष्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारची उर्जा मिळत असते.

अशा प्रकारचे विचार रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी मालेगाव येथे बोलताना व्यक्त केले. ते मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये बोलत होते . मालेगाव येथील पंचायत समिती सभागृहात 16 जून रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते.

तसेच प्रमुख उपस्थिती माजी आमदार किसनराव गवळी, पंचायत समिती सभापती सौ रंजनाताई मधुकरराव काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे , मालेगाव तहसीलचे नायब तहसीलदार रवींद्र भाबड, मालेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय राहुल गंधे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राचार्य वसंतराव अवचार , तसेच माजी जिल्हाध्यक्ष प्रा भरत आव्हाळे, मराठा सेवा संघ विभागीय सचिव प्रा अनंतराव गायकवाड, बुलढाणा जिल्हा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रा डॉ योगेश निकस, मधुकरराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार झनक पुढे म्हणाले की आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटीची नितांत गरज असते. त्यासाठी कठोर परिश्रम करा, आपले आई-वडिलांना विसरू नका ,तसेच गुरुजनांच्या उपकाराची जाण ठेवा .असे म्हणाले यावेळी बोलताना माजी आमदार किसनराव गवळी यांनी आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व विशद केले . तसेच मराठा सेवा संघ राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक त्यांनी केले. नारायणराव काळबांडे यांनी स्वामी विवेकानंद, डॉ अब्दुल कलाम यांचे साहित्य वाचा . त्यामधुन नवी विशा मिळेल असे सांगीतले नायब तहसीलदार रविंद्र भाबड व पी एस आय राहुल गंधे यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले.

जिजाऊ वंदने नंतर प्राचार्य वसंतराव यांनी प्रास्ताविकामधुन गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबाबत मराठा सेवा संघाची भुमिका विशद केली . त्यानंतर १० वी , १२ वी , JEE , NEET , MPSC, तसेच नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या एकुण ७० सर्व जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणी सोमेश व पुष्पक बळी या दोन शौर्यवंतांचा मोमेंटो , पुस्तक , प्रमाणपत्र व युष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशांत वाझुळकर, तेजराव पाटील जाधव , ता अध्यक्ष अनिल गवळी , प्रविण पाटील , मनोज वाझुळकर , बबनराव सोनाळकर , शेषराव जाधव , भागवत मापारी , दत्तराव पोफळे, श्रीराम अवचार, आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन नागेश कव्हर यांनी केले तरअनिल गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो पालक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: