TRAI – केंद्र सरकार स्पॅम आणि फ्रॉड कॉल्सबाबत नियम आता आणखी कडक झाले आहे. फसवणूक आणि स्पॅम कॉलपासून युजर्सची सुटका करण्यासाठी योजना तयार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. याबाबत ट्रायच्या वतीने २३ फेब्रुवारीला बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये, सर्वमान्य संमतीने एक योजना तयार करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत एखादा वापरकर्ता त्याचा वैयक्तिक मोबाइल नंबर प्रमोशन आणि स्पॅम कॉलसाठी वापरतो, तो मोबाइल नंबर 2 वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. तसेच त्या पत्त्यावर कोणतेही नवीन सिम कार्ड दिले जाणार नाही.
ज्या अंतर्गत TRAI ने प्रमोशन कॉल्ससाठी वेगळे नवीन 10 अंकी मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून वापरकर्ते दुरूनच प्रमोशन आणि स्पॅम कॉल ओळखू शकतील. तसेच, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने स्पॅम आणि फसवणूक कॉलला आळा घालण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रमोशनल आणि स्पॅम कॉल्स ओळखण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांना TRAI ने 7 वेगवेगळ्या श्रेणीं (कैटेगरी) मध्ये 10 अंकी मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ट्रायने 7 श्रेणी तयार केल्या आहेत. या सर्व श्रेणींसाठी विविध प्रकारचे मोबाइल क्रमांक जारी केले जातील. ज्याच्या मदतीने वापरकर्ते फसवणूक आणि स्पॅम कॉल ओळखू शकतील आणि त्यांना ब्लॉक करू शकतील. याशिवाय डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच DND सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
ही नवीन मोबाइल कैटेगरी असेल
- बँकिंग/विमा/आर्थिक उत्पादने/क्रेडिट कार्ड
- शिक्षण
- आरोग्य
- ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन
- संप्रेषण/प्रसारण/मनोरंजन/IT
- प्रेक्षणीय स्थळ (पर्यटन)