Monday, December 23, 2024
Homeराजकीयजर दम दिला तर घरात घुसून...आमदार रवी राणा यांचा धमकीवजा इशारा...

जर दम दिला तर घरात घुसून…आमदार रवी राणा यांचा धमकीवजा इशारा…

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वादावर कालच पडदा पडला असल्याची बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती, बच्चू कडू यांनी “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. मात्र रवी राणा यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलतांना पुन्हा धमकीवजा वक्तव्य केल्याने आता वाद पुन्हा पेटणार का?…याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आम्ही आनंद व्यक्त करतो.आम्हाला विनाकारण जास्त हातपाय हलवावे लागले असते.आपण जो काही मोठेपणा दाखवला, आणि चूक लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्द्ल खरतर पुन्हा एकदा आभार मानतो.तुम्ही दोन पाऊल माघार घेतली आम्ही चार पावले माघार घेतो. सोबतच “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रवी राणा म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

“प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू यांना दिला….

काल बच्चू कडू यांनी, आज माझा अपमान झाला मात्र आम्हाला सामान्य माणसाचा अपमान होऊ द्यायचा नाही ही सगळी ऊर्जा सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खर्च करायची आहे असे सांगत बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी खोके प्रकरणात केलेल्या आरोपंवार पडदा टाकला होता, मात्र आज रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने आणखी वाद वाढतो कि काय?…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: